
Navi Mumbai: कोपरखैरणेतील बोनकोडे गावात बनावट आधार, पॅन कार्ड बनवून अनेक वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी सकाळी ही कारवाई केली.
कोपरखैरणे सेक्टर-१२ मधील बोनकोडे गावात बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.