पनवेल : ई-चलन आणि वाहतुकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्याय कारक कायद्यांच्या विरोधात मंगळवार (ता.1) पासून वाहतुकदारांचे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरु झाला आहे. या संपात नवी मुंबई मधील 70 हजार अवजड वाहनांचा समावेश आहे. ई चलन कारवाई थांबवावी, आधी केलेल्या कारवाईचा दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा, अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे.