नवी मुंबई : पामबीच मार्गावर भरधाव कारची स्कुटीला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवी मुंबई : पामबीच मार्गावर भरधाव कारची स्कुटीला धडक

नवी मुंबई : पाम बीच मार्गावर भरधाव वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला; तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. रविवारी मध्यरात्री अक्षर चौकात ही दुर्घटना घडली. एनआरआय पोलिसांनी अपघातातील वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.

प्रियंका हादिमानी (वय २३) असे मृताचे नाव आहे. संजोग गोरे (२६) हा अपघातात जखमी झाला आहे. संजोग हा तुर्भे सेक्टर-२० मध्ये राहत आहे; तर प्रियंका ही तुर्भे फायजर रोडवरील हनुमान नगरमध्ये राहत होती. संजोग आणि प्रियंका हे दोघे पुढील वर्षी विवाहबद्ध होणार होते.
रात्री ११ वाजता दोघेही दुचाकीवरून नेरूळ येथे जेवण करून रात्री १ वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथून पाम बीच मार्गे तुर्भे येथे घरी जात होते.

हेही वाचा: पुणे : मोफत सातबारा वाटपाचा खळद येथून प्रारंभ

अक्षर चौकात आल्यानंतर मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात प्रियंका दूरवर फेकली गेल्याने ती गंभीर जखमी झाली; तर संजोग हा फरपटत गेल्याने गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दोघांना नेरूळ येथील तेरणा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी प्रियंकाला मृत घोषित केले. संजोग याच्यावर उपचार सुरू आहेत.

loading image
go to top