esakal | पुणे : मोफत सातबारा वाटपाचा खळद येथून प्रारंभ । satbara
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : मोफत सातबारा वाटपाचा खळद येथून प्रारंभ

पुणे : मोफत सातबारा वाटपाचा खळद येथून प्रारंभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खळद : राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मोफत सुधारित सातबारा वाटपाचा प्रारंभ शनिवारी (ता. २) खळद (ता. पुरंदर) येथील माऊली गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजित केल्याची माहिती दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.

हेही वाचा: अर्जदारावर दबाव आणल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

या कार्यक्रमाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त निरंजन सुधांशू, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख, ई फेरफार प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक रामदास जगताप, कुळ कायदा उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित राहणार आहेत.

शासनाच्या वतीने सध्या सर्वत्र इ पीक पाहणी मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यासाठी खळद येथे तहसीलदार सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी प्रभावती कोरे, तलाठी सोमशंकर बनसोडे व ग्रामस्थ प्रयत्न करत असून, आपण स्वतः केलेल्या नोंदणीचा सुधारित सातबारा मिळणार आहे. याबाबत नागरिकांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: अर्जदारावर दबाव आणल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

आंबेगावात आजपासून गावनिहाय नियोजन

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरी असलेला सात बारा उतारा २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मंडलनिहाय तलाठी कार्यालयांतर्गत मोफत घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सारंग कोडलकर व तहसीलदार रमा जोशी यांनी दिली. त्यासाठी गावनिहाय वाटपाचे नियोजन केले आहे. त्यानुसार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डिजिटल स्वाक्षरीत ७ /१२ वितरित करणार आहे.

हवेली तालुक्यातील ३७ गावांत नियोजन

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील ३७ गावांमध्ये २ ऑक्टोबरला शेतकऱ्यांना सातबारा वितरित करणार असून, ९ऑक्टोबरपर्यंत हवेलीतील सजामधील प्रत्येक गावांमध्ये सातबारा देण्याच्या कामासंदर्भात तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, संजय गांधी निराधार योजनेतील काम, असे एकूणच ‘शासन आपल्या दारी’ हाही उपक्रम राबविण्याच्या सूचना व त्याविषयी प्रत्येक मंडलाधिकारी कार्यक्षेत्रानुसार कार्यक्रम पत्रिका ठरवून दिलेली आहे, असे तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.

loading image
go to top