

Navi Mumbai News: पनवेल येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेत एका रिक्षात झोपलेल्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे सायन-पनवेल मार्गावर जुईनगरजवळ घडली.
घनश्याम जैस्वाल (५०, रा. तुर्भे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी कारचालक विष्णू देवानंद राठोड (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. राठोड हा स्थापत्य अभियंता आहे.