नवी मुंबई प्रशासनाची डोकेदुखी ठरतीये वाढती कोरोनाबाधितांची संख्या, आज दिवसभरात तब्बल...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

आतापर्यंत शहरातील 4 हजार 586 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 हजार 119 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाशी : नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी (ता.6) नवी मुंबईत नवीन 164 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबांधितांचा आकडा 7 हजार 957 इतका झाला आहे. परिणामी, नवी मुंबई प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कंन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे. 

नक्की वाचा : आमचाही बँक बॅलन्स आता झिरोवर, हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्यांची हृदयद्रावक व्यथा 

नवी मुंबईतील उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची एका दिवसातील संख्या 153 इतकी आहे. आतापर्यंत शहरातील 4 हजार 586 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 हजार 119 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. करोनामुळे सोमवारी 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 252  वर पोहोचला आहे. 

हे ही वाचा : पॅसेजमध्येच रुग्णांना ऑक्सिजन; डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...

नवी मुंबईत आत्तापर्यत 22 हजार 533 कोव्हीड रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येसमोर चाचणीचे प्रमाण कमी आहे. कोरोना रुग्णाची संख्येत वाढ होत असल्यामुळे व सरकारच्या नियमानूसार रुग्णालयाची संख्या कमी असल्यामुळे संशय नसणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे.

Navi Mumbai administration head aches are increasing because of corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai administration head aches are increasing because of corona