राजकीय उलथापालथीमध्ये नवी मुंबई विमानतळ नामकरण तिढा सुटणार?

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावास माझा कधीच विरोध नव्हता... मुख्यमंत्र्यांचा हा शब्द आणि भूमीपुत्रांमध्ये आनंदाचे एकच वातावरण
I have never opposed the name of D B Patil at Navi Mumbai Airport Chief Minister Udhav thackrey
I have never opposed the name of D B Patil at Navi Mumbai Airport Chief Minister Udhav thackrey

डोंबिवली - नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याविषयी माझा कधीही विरोध नव्हता. सिडकोने हा प्रस्ताव मांडला असला तरी राज्य शासनाकडे तो मंजुरीसाठी कधी आला नाही. दि. बा. यांच्या नावाला माझा पाठिंबा असल्याचे मी जाहीर करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच भूमीपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी कोळी समाजाचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळेल. यामुळे आम्ही खुश आहोत. शिवसेनेच्या भूमिकेविषयी भूमीपुत्रांच्या मनात अनेक गैरसमज होते, मात्र सेना प्रमुख ठाकरे यांच्या पाठिंब्याने आज ते दूर झाले असल्याचे मत माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केले. सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भूमीपुत्रांची भावना लक्षात घेत जाहीर केलेला पाठिंबा यामुळे नवी मुंबई विमानतळ नामकरण तिढा सुटणार का? हे पहावे लागेल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्त नेत्यांची मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबत एक बैठक पार पडली. या बैठकित आमदार बाळाराम पाटिल, माजी आमदार सुभाष भोईर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटिल, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, काँग्रेसचे संतोष केणे, प्रकल्पग्रस्त नेते तांडेल, राजाराम पाटिल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नामांतराला माझा पाठिंबा जाहीर करतो असे बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले. सिडको प्रशासनाने नवी मुंबई विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासंदर्भात ठराव केला होता. मात्र तो राज्य शासनाकडे कधी आला नाही. शिवसेना पक्षाच्या वतीने बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव कधीच केला गेला नाही. अशी कोणतीही भूमिका घेण्यात आली नव्हती असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगताच आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. गेले अनेक वर्षे आगरी, कोळी भूमिपुत्र दि. बा. यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावे यासाठी लढा देत आहे. सिडकोच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला गेला असून राज्य शासनाकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे भूमीपुत्रांना सांगितले जात होते. यामुळे शिवसेने विषयी अनेक गैरसमज भूमीपुत्रांमध्ये होते. मात्र आता ते दूर झाले असल्याचे माजी आमदार भोईर म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट झाली असता बैठकीत त्यांनी जर ठरवल असत तर कधी ही मी सभागृहात विषय मंजुर करुन नामकरण जबरदस्तीने केले असते पण मी जाणिवपुर्वक हा विषय आजतागायत सभागृहात घेतला नाही. नामांतरण विषय फक्त सिडको बैठकीत मंजुर झाला आहे. संभाजीनगर शहरासारख सभागृहात मंजुर झालेला विषय नाही त्यामुळे काळजी नसावी. आज मी तुम्हाला अश्वासित करतो कि शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाची एकजुठ अभेद्य रहावी म्हणुन आपली हयात घालवली त्याच शिवसेनाप्रमुखांच्या नावासाठी मी मराठी माणसात फुट पाडणार नाही. विशेषताः आगरी कोळी समाजाचे शिवसेना पक्षावर खूप ऋण आहेत. त्यामुळे यापुढे आपण एकीने दि बा पाटिल साहेंबांच्या नावासाठी आग्रही राहु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी लोकभावनेचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे भोईर म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच, माजी आमदार भोईर हे जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. भूमीपुत्रांच्या पाठीशी नेहमी उभे असणारे भोईर यांनी नामकरण समिती सोबत मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत विमानतळ नामकरणाचा तिढा सोडविला असल्याची भावना स्थानिक भूमीपुत्रांमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com