
Latest Uran News: उरण येथील पाणजेच्या २८९ हेक्टर पाणथळ प्रदेशात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. वन्यजीवप्रेमी पराग घरत यांनी या पक्ष्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर शेअर केली आहेत. यामध्ये ३००हून अधिक फ्लेमिंगो या भागात विहार करताना दिसल्याचे पराग यांनी सांगितले. फ्लेमिंगोंचे हे नयनरम्य दृश्य पाहून पर्यावरणवाद्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मागील काही महिन्यांपासून काही खासगी विकसकांच्या स्वार्थामुळे उरण तालुक्यातील पाणथळ प्रदेशातील पाणीपुरवठा खंडित करण्याचे प्रयत्न झाले होते