Navi Mumbai: केरळचे नागरिक झाले नवी मुंबईचे फॅन; बातमी वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Navi Mumbai
Navi Mumbaiesakal

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेला भेट दिलेल्या केरळ राज्यातील मलाप्पुरम जिल्हा पंचायतीच्या अभ्यास गटाला शहराच्या वैभवाची भुरळ पडली आहे. नवी मुंबईत फिरल्यानंतर आणि विविध भागांची पाहणी केल्यानंतर जिल्हा पंचायतीच्या सदस्यांना स्वच्छता आणि महापालिकेने केलेल्या सुशोभीकरण पसंतीस पडले आहे.

देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छतेमधील मानांकन सातत्याने उंचावणारे शहर म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईतील स्वच्छता व सुशोभीकरणाच्या अनुषंगाने महापालिकेने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी देशातील विविध भागांतून अभ्यासक, जाणकार व्यक्ती, मान्यवर लोकप्रतिनिधी नवी मुंबईस भेट देत असतात.

Navi Mumbai
Navi Mumbai: एक-दोन नाही तर नवी मुंबई महापालिकेच्या १५० कोटींच्या मालमत्ता धुळ-खात!

या धर्तीवर केरळ राज्यातील मलाप्पुरम जिल्हा पंचायत अध्यक्ष एम. के. राफिखा आणि इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रास भेट दिली. येथील स्वच्छता, सुशोभीकरण व पर्यावरणविषयक विविध प्रकल्पांची त्यांनी प्रशंसा केली.

या पाहणी दौऱ्यात त्यांनी आयकॉनिक इमारत असलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयास आणि कोपरखैरणे येथील अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञावर आधारित मलप्रक्रिया केंद्र व टर्शिअरी ट्रीटमेंट प्लांट यांची पाहणी केली.

Navi Mumbai
Navi Mumbai: नवी मुंबई महानगर पालिका पाणीटंचाईवर जलकुंभातून करणार मात

त्यानंतर सांडपाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया जाणून घेतली. त्याचप्रमाणे जमीन भरणा पद्धतीवर आधारित तुर्भे एमआयडीसी येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि तेथील सी अँड डी वेस्ट प्रकल्पाची पाहणी केली. या भेटीमध्ये मलाप्पुरम जिल्हा पंचायतीच्या अभ्यासगटाने नवी मुंबईतील रस्ते, चौक, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशा विविध ठिकाणी केलेल्या सुशोभीकरणाची प्रशंसा केली.

आगळ्यावेगळ्या संकल्पनेची नोंद

कोपरखैरणे सेक्टर १४ येथील पूर्वीची क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून त्या ठिकाणी निर्माण केलेल्या निसर्ग उद्यानाला भेट देत या अभ्यासगटाने महापालिकेच्या दूरगामी विचारप्रणालीचे कौतुक केले. त्या ठिकाणी असलेल्या स्वच्छता पार्कलाही भेट दिली. त्यांनी या आगळ्यावेगळ्या संकल्पनेची विशेष नोंद घेतली.

Navi Mumbai
Navi Mumbai Airport: शरद पवारांनी दिला नैना प्रकल्पाच्या विरोधाला पाठिंबा !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com