esakal | नवी मुंबई : ऐरोलीच्या जैवविविधता केंद्रात इलेक्ट्रिक बोट! | Navi Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

boat

नवी मुंबई : ऐरोलीच्या जैवविविधता केंद्रात इलेक्ट्रिक बोट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


वाशी/नवी मुंबई : वाढत्या प्रदूषणावर (Pollution) तोडगा काढण्यासाठी शहरी भागात (city area) सार्वजनिकसह खासगी वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर (Electric vehicle) भर दिला जात असताना आता ऐरोलीतील सागरी जैवविविधता (Airoli biodiversity) केंद्रात खाडीतील सफरीकरिता ‘इलेक्ट्रिक बोट’ची (Electric Boat) खरेदी करण्यात येणार आहे; मात्र याआधी महाराष्ट्र सागरी मंडळाचा अहवाल आल्यानंतरच बोट खरेदीवर शिक्कामोर्तब होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबई : मोतीलाल नगर पुनर्विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठित

ठाण्यासह नवी मुंबई शहराला मोठा खाडी किनारा लाभला आहे. या खाडी परिसरात २०० पेक्षा जास्त पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येत असतात. ऐरोली खाडीतही विविध प्रजातीचे पक्षी येत असत. ते पाहण्यासाठी महाराष्ट्र वन खात्यामार्फत ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटक यांच्याकरिता बोटिंग सफर सुरू केली आहे.

याला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. फ्लेमिंगो पाहण्यासाठी बहुतांशी पर्यटक पसंती देतात. मागील वर्षी जानेवारी २०२१ महिनाअखेरपर्यंत आगाऊ बुकिंग केले होते, तर फेब्रुवारी २०२१ पर्यंतची आगाऊ बुकिंग केली होती. आता वन विभागाच्या ताफ्यात तीन बोट उपलब्ध असून, नवीन बोट घेण्याचा निर्णय घेतला होता; मात्र राज्य पर्यावरण विभाग आणि वन विभाग यांनी इलेक्ट्रिक बोट घ्यावी, असे सूचित केले.

त्यानुसार आता केंद्राने इलेक्ट्रिक बोट घेण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी आधी केंद्रातील खाडीची भौगोलिक माहिती घेऊन इलेक्ट्रिक बोट खाडीमध्ये कशा पद्धतीने सुरू करता येईल, काही अडचणी येतील का, याची चाचपणी घेण्यात येणार आहे. बोट खाडीमध्ये उत्तमरीत्या सुरू करता येईल याची हमी मिळाल्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळाचा अहवाल घेतला जाईल. त्यानंतर इलेक्ट्रिक बोट खरेदी करून लवकरच ताफ्यात दाखल होणार आहे.

"सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात बोटिंग सफरीला अधिक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नवीन बोट घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या वन विभाग आणि पर्यावरण विभागाच्या निर्देशाने इलेक्ट्रिक बोट घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याची चाचपणी करून तसेच बोट चार्जिंगबाबत काही समस्या असतील का, याचा अहवाल आल्यानंतरच ही इलेक्ट्रिक बोट ताफ्यात दाखल होईल. त्यामुळे आवाजविरहित बोट आल्यास पर्यटकांना अजून जवळून पक्षी निरीक्षण करता येईल."

- एन. जे. कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग

loading image
go to top