

Ghansoli Crime
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली येथे १४ वर्षीय विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रीत हरेराम रानकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रीत रानकर हा घणसोली गावातील रानकर आळी येथे आपल्या पालकांसोबत राहत होता. तो स्थानिक नवी मुंबई सिटी स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी, २० मार्च रोजी सायंकाळी घरात कोणीही नसताना त्याने किचन आणि हॉलमधील पडद्याच्या रॉडला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला.