Navi Mumbai Crime: युएस डॉलर खरेदीचे अमिष दाखवून उकळले ५७ लाख

मुंबई : सायबर चोरटयाने युएस डॉलर खरेदीचे अमिष दाखवून उकळले ५७ लाख
Fraud
FraudEsakal

युएस डॉलर खरेदी केल्यास दुप्पट फायदा होईल असे अमिष दाखवून एका सायबर चोरटयाने खारघरमध्ये राहणाऱया व्यक्तीला ऍपच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर लाखो रुपये पाठविण्यास भाग पाडून त्याच्याकडून तब्बल ५७ लाख ६३ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Fraud
Nashik Crime: बतावणी करून महिलेची पोत केली लंपास; मोफत रेशन भेटत असल्याचे सांगत केली हातचलाखी

खारघर पोलिसांनी या सायबर चोरटया विरोधात फसवणूकीसह अपहार तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले हरेंद्र सिंग (५३) हे खारघर सेक्टर-१२ मध्ये राहण्यास असून ते मर्चंट नेव्हीमध्ये इलेक्ट्रीशीयन म्हणून कामाला आहेत. गत जून महिन्यामध्ये सायबर टोळीतील जेनी नामक व्यक्तीने हरेंद्र सिंग यांना टेलिग्रामवरुन मेसेज पाठवून डॉफ्ल नावाचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले होते

हरेंद्र सिंग यांनी सदरचे ऍप डाऊनलोड केल्यानंतर सायबर चोरटयाने बायनान्सचे डॉलर खरेदी केल्यास दुप्पट फायदा होईल असे वारंवार हरेंद्र सिंग यांना सांगून त्यांना बायनान्सचे खाते उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर हरेंद्र सिंग यांनी जेनीच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या व्यक्तींच्या खात्यावर डॉलरच्या स्वरुपात लाखो रुपये पाठविण्यास सुरुवात केली.

Fraud
Pune Crime News : पुण्यात चाललंय तरी काय? झोपमोड केली म्हणून भाडेकरुने केली घरमालकाची हत्या; घटनेने खळबळ

त्यानंतर सायबर चोरटया जेनी याने हरेंद्र सिंग यांच्या बायनान्स खात्यावर १ हजार डॉलर पाठविल्याचे दाखविले. त्यामुळे हरेंद्र सिंग यांचा सायबर चोरटया जेनीवर विश्वास बसल्यानंतर हरेंद्र सिंग याने जेनीच्या संगण्यावरुन आणखी काही लाखांची रक्कम वेगवेगळ्या खात्यात पाठवून दिली. अशा पद्धतीने हरेंद्र सिंग यांनी १५ जुन ते १ ऑगस्ट या कालावधीत एकुण ५७ लाख ६३ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात पाठवून दिले.

त्यानंतर हरेंद्र सिंग यांनी वेगवेगळ्या खात्यात पाठविलेल्या रक्कमच्या युएसडी डॉलरची मागणी केली असता, जेनी याने टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे हरेंद्र सिंग यांनी आपले पैसे परत मागीतले असता, सदर रक्कम सुद्धा परत देण्यास जेनी याने टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरेंद्र सिंग यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Fraud
Pune Crime News : पुण्यात चाललंय तरी काय? झोपमोड केली म्हणून भाडेकरुने केली घरमालकाची हत्या; घटनेने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com