esakal | पोटच्या बाळाची हत्या करून तीने उचलंलं धक्कादायक पाऊल; मानसिक संतुलन ढासळल्याचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

पोटच्या बाळाची हत्या करून तीने उचलंलं धक्कादायक पाऊल; मानसिक संतुलन ढासळल्याचा अंदाज

चेंबूरमधील एका विवाहितेने  आपल्या एका वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्यानंतर स्वत:देखील मुलाच्या मृतदेहासह धावत्या लोकलमधून वाशी पुलावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

पोटच्या बाळाची हत्या करून तीने उचलंलं धक्कादायक पाऊल; मानसिक संतुलन ढासळल्याचा अंदाज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी मुंबई  : चेंबूरमधील एका विवाहितेने  आपल्या एका वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्यानंतर स्वत:देखील मुलाच्या मृतदेहासह धावत्या लोकलमधून वाशी पुलावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. मानसिक संतुलन बिघडल्याने महिलेने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल केला. 

पती व कुटुंबीयांसह चेंबूर येथे राहणारी मयुरी बिरादर गेल्या दीड-दोन वर्षांपासून माहेरी, पुण्यात राहत होती. वर्षभरापूर्वी तिला मुलगा झाला. शनिवारी, 6 फेब्रुवारी रोजी मुलाचा वाढदिवस असल्याने मयुरीची आई सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती. यादरम्यान, घरामध्ये कुणालाही न सांगता गुरुवारी ती बाळासह पुण्यातून मुंबईत आली. सीएसएमटीहून गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास पनवेल लोकलने महिला डब्यातून निघाली होती. वाशी खाडीपुलावर आल्यानंतर तिने बॅगेसह धावत्या लोकलमधून उडी टाकून आत्महत्या केली. 
हा प्रकार लोकलच्या डब्यामध्ये असलेल्या होमगार्ड व 25 ते 30 महिलासमोर घडल्याने याबाबत वाशी रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी वाशी खाडीपुलावर धाव घेतली असता मयुरी मृतावस्थेत आढळली. या वेळी पोलिसांनी तिच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात बाळाचा गळा कापलेला मृतदेह आढळला. महिलेजवळ सापडलेल्या मोबाईलवरून रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना संपर्क साधल्यानंतर तिची ओळख पटली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून सीएसएमटी ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मयुरी बिरादर हिने डीएडचे शिक्षण घेतले आहे. मूळची पुण्याच्या असलेल्या मयुरीचा सात वर्षांपूर्वी चेंबूर येथे राहणाऱ्या तरुणासोबत विवाह झाला होता. पतीच्या घरी चार भावांचे एकत्र कुटुंब असल्याने मागील दीड-दोन वर्षांपासून ती माहेरी पुण्यात राहात होती. मूल होत नसल्याने काही वर्षांपासून मयुरीचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याबाबत तिच्यावर उपचारदेखील सुरू होते. वर्षभरापूर्वी तिला मुलगा झाल्यानंतरही ती बाळाच्या बाबतीत आपल्या कुटुंबीयांकडे तक्रारीदेखील करत होती. एकूणच मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आलेल्या तणावातून तिने हा प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

-------------------------------------------------------

navi mumbai crime latest marathi news mother wrong with baby Vashi creek current update

loading image