मुंबई
Navi Mumbai Crime: मठामध्ये सेवादार असलेल्या व्यक्तीने पैशासाठी आईलाच केली मारहाण; गुन्हा दाखलं
Latest Crime news:
वाशी सेक्टर १४ येथील श्री आनादपूर मठामध्ये सेवादार असलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तिच्या मुलाने बेदम मारहाण करून तिने जमा केलेली पाच लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपक धर्मवीर सोबती (३४) असे या मुलाचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
तक्रारदार प्रेमलता धर्मवीर सोबती (६५) या वाशी सेक्टर १४ मधील एमजी कॉम्फ्लेक्स येथील श्री आनादपूर मठामध्ये सेवादार म्हणून कार्यरत आहेत. त्या त्याच ठिकाणी मठामध्ये राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा दीपक हादेखील त्याच मठामध्ये राहण्यास असून त्याला नशा करण्याची सवय आहे. सोमवारी (ता. ९) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दीपक मठामध्ये गेला होता.

