crime
sakal
नवी मुंबई : महापे एमआयडीसी परिसरातील नाल्याशेजारी सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. विजेच्या खांबावरील वायर चोरी केल्याच्या संशयावरून एका ३१ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. ‘फोन-पे’वर झालेले पैशांचे व्यवहार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या हत्येचा छडा लावला.