Navi Mumbai Crime: पिस्तुल आणि कोयत्याने दहशत माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crimesakal

Navi Mumbai Crime: पिस्तुल व कोयत्याचा धाक दाखवुन दिघा परिसरात दहशत माजविणाऱ्या त्रिकुटांपैकी दोघांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असुन पोलिसांकडुन त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या त्रिकुटाने गत शुक्रवारी मध्यरात्री दिघा ईश्वर नगरमधील एका चिकन शॉप चालकावर पिस्तुल रोखुन त्याच्यावर गोळीबार केला होता. मात्र सुदैवाने पिस्तुल मधुन गोळी फायर न झाल्याने तो यातून बचावला होता. त्यानंतर हे त्रिकुट फरार झाले होते.

Navi Mumbai Crime
Nanded Crime News : ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करून लुटले; ‘एटीएम‘ मधून पैसे काढून घरी परतताना घडला प्रकार

या प्रकरणातील तक्रारदार एजाज मोहम्मद रफिक खान (36) याचा दिघा येथील ईश्वर नगर भागामध्ये चिकन विक्रीचे दुकान आहे. एजाज खान याच्या दुकानात काम करणारा कर्मचारी व त्याचा पुतण्या हे चिकनच्या दुकानात झोपतात.

गत शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास एजाज खान याचे कर्मचारी दुकानात झोपलेले असताना गणपती पाडा भागातील संजय उर्फ संज्या व त्याचे साथीदार प्रथमेश व अक्षय कोळी हे तिघेही हातामध्ये कोयते घेऊन चिकनच्या दुकानात घुसले.

Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crime: परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, 23 जणांकडून उकळले...!

त्यानंतर या तिघांनी दुकानात झोपलेल्या कर्मचाऱयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका कर्मचाऱयाने फोनवरुन याबाबतची माहिती एजाज खान याला दिल्यानंतर एजाजने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्याने आपल्या कर्मचाऱयाला सोडवण्याचा प्रयत्न केला असता,

आरोपी संज्या याने त्याच्याजवळ असलेले पिस्तूल एजाज खान याच्यावर रोखुन त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी गोळीबार झाल्याचा आवाज झाला, मात्र, पिस्तुलात गोळी फायर झाली नाही, त्यामुळे एजाज खान बचावला.

यावेळी आरोपी प्रथमेश आणि अक्षय या दोघांनी त्यांच्या हातातील कोयता उंचावत कुणी मध्ये आल्यास त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे आजुबाजुचे लोक जमा झाल्याने नागरिकांनी या तिन्ही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, तिघांनी त्याठिकाणावरुन पलायन केले.

या प्रकारानंतर एजाज खान याने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संजय उर्फ शेंडी गबाजी गाडेकर, प्रथमेश विनायक होसमनी व आशिष रमेश कोळी या तिघांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे तसेच आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन प्रथमेश होसमनी व आशिष कोळी या दोघांना अटक केली आहे.

यातील मुख्य आरोपी संजय गाडेकर हा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडुन त्याचा शोध घेण्यात येत आहे. सदरचे गुन्हेगार परिसरामध्ये घरफोडी, चोरी, लुटमारी यासारखे गुन्हे करतात. यातील संजय गाडेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांची परिसरात दहशत आहे.

Navi Mumbai Crime
Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com