Nanded Crime News : ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करून लुटले; ‘एटीएम‘ मधून पैसे काढून घरी परतताना घडला प्रकार

नांदेड शहरातील अष्टविनायकनगर भागात मंगळवारी (ता.७) एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर भरदिवसा गोळीबार करून त्यांच्याकडील नगदी ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली.
Nanded Crime News
Nanded Crime NewsSakal

Nanded News : नांदेड शहरातील अष्टविनायकनगर भागात मंगळवारी (ता.७) एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर भरदिवसा गोळीबार करून त्यांच्याकडील नगदी ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली.

अष्टविनायकनगर येथील सेवानिवृत्त अधिकारी रवींद्र जोशी (वय ६८) हे ‘एटीएम‘ मधून पैसे काढून घरी परत येत असताना पाठलाग करणाऱ्या दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून ४० हजार रुपये लुटून नेल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली.

तत्पूर्वी रवींद्र जोशी यांनी एका लुटारूला पकडून खाली पाडून त्याचा प्रतिकार केल्यावर लुटारूंनी गोळीबार केला. यात ते गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

याप्रकरणी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. याप्रकरणी मोठा पोलिस फौजफाटा अष्टविनायकनगरमध्ये पोचला असून, विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com