ऐरोली नाक्‍यातील जुगार अड्ड्यावर कारवाई; चार जणांना अटक | Navi Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gambling Case

ऐरोली नाक्‍यातील जुगार अड्ड्यावर कारवाई; चार जणांना अटक

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी (Rabale Police) ऐरोली नाका (Airoli) येथील पादचारी पुलाजवळ (Pedestrian bridge) सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर (Gambling club) छापा मारून कल्याण मटका जुगार चालविणारे व खेळणारे अशा चौघांना अटक (four culprit arrested) केली. कारवाईत पोलिसांनी मटका खेळण्यासाठी लागणारे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली आहे.

हेही वाचा: पालिका निवडणुकीसाठी राजकीय बैठका?

ऐरोली नाका येथील पादचारी पुलाजवळ मोकळ्या जागेत काही व्यक्ती मटका चालवत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक बोडरे व त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा मारला.

याठिकाणी दीपक गंगाराम बाविस्कर (४२), संजय बबाजी गजरे (४५) व शरद मोतीराम मनवर (५८) हे तिघे कल्याण मटका जुगार खेळवत असल्याचे तसेच मनीराम चौहान (४४) हा सदरचा जुगार खेळताना आढळला. पोलिसांनी चौघांसह जुगार बुक, मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या व रोख रक्कम जप्त केली.

loading image
go to top