
नवी मुंबईतील वाशी रुग्णालयात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेऱ्याद्वारे कैद केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला झाला आहे. नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मृत तरुणीच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.