

Navi Mumbai Power Crisis
ESakal
पनवेल : पाणीटंचाई आणि गढूळ पाणीपुरवठ्याने आधीच होरपळणाऱ्या कामोठेकरांच्या अडचणीत आता वीज संकटाची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा संयमाचा शनिवारी (ता. ७) रात्री अखेर उद्रेक झाला आणि हजारोंच्या संख्येने घराबाहेर पडत महावितरणसह लोकप्रतिनिधींविरोधात एल्गार पुकारला. नागरिकांनी कामोठे पोलिस ठाण्यावर धडक देत मध्यरात्री ठिय्या आंदोलन सुरू केले.