Electric Bus Fire: दोन दिवसांपूर्वी घणसोलीत इलेक्ट्रिक बसला आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील घणसोली आगारात ४ जूनला इलेक्ट्रिक बसला लागलेल्या आग प्रकरणी एनएमएमटी प्रशासनाने उत्पादक आणि पुरवठादार कंपनीला नोटीस दिली आहे.