

Navi Mumbai Airport
ESakal
मुंबई : नवी मुंबई विमानतळावर नुकतीच प्रवासी सेवा सुरू झाली, मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विमानतळ प्रशासनाने वाय-फाय सुविधा उपलब्ध केली असली, तरी विमानतळावर दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांना अव्वाच्या सव्वा दर आकारले आहे. तोपर्यंत त्यांना परिसरात परवानगीही नाकारली आहे. याविरोधात दूरसंचार कंपन्यांच्या संघटनेने दूरसंचार मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.