

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन आठ महिने उलटले, तरी प्रशासकीय त्रुटींमुळे प्रवाशांचा प्रवास सुविधांऐवजी समस्यांनीच भरलेला आहे. अपुऱ्या सार्वजनिक वाहतुकीमुळे मनमानीपणे आकारले जाणारे टॅक्सीचे अवाजवी भाडे, दिशादर्शक फलकांचा अभाव, महागडे खाद्यपदार्थ, बंद चार्जिंग पॉइंट आणि पाण्याच्या सुविधेतील अनियमिततेमुळे विमानतळावर गैरसोयींची 'उड्डाणे' सुरू आहेत. प्रवासी कोंडीबाबत विमानतळ व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता ते चौकशी करून सांगतो, असे सांगून हात वर करीत आहेत.