esakal | खालापूरातील मोरबा धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Morbe Dam

खालापूरातील मोरबा धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खालापूर: नवी मुंबईची (navi mumbai) तहान भागवणारे खालापूर (khalapur) तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मोरबा धरणातून (morbe dam) कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होणार असल्याने धावरी नदीकाठच्या (Dhavari river) गावांना सतर्कतेचा इशारा (villages on alert) देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे चौक येथील मोरबा धरण पातळीत (water level) चांगलीच वाढ झाली आहेत.

हेही वाचा: पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

धरणाची माथा पातळी 88 असून पूर्ण संचय जलसाठा 190.890 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. तालुक्यात सध्या मुसळधार पडणा-या पावसाने धरण पात्रात चांगलीच वाढ झाली आहे. सोमवारी पाण्याची पातळी 86.97 मीटर इतकी होती. तर एकूण जलसाठा 181. 038 दशलक्ष घनमीटर इतका होता. हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा यामुळे माथा पातळी कधी ओलांडण्याची शक्यता असल्याने जादा पाणी सांडव्यातून वक्राकार मार्गे नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोरबे नवी मुंबई महानगरपालिका यांनी लेखी पत्राद्वारे तहसीलदारांना दिली आहे.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या जादा पाण्याचा विसर्ग धावरी नदीतून होणार असल्याने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थाने सतर्क राहून मासेमारी किंवा अन्य कारणाकरता नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय पाच दिवसाचे विसर्जन देखील करताना सावधगिरी बाळगावी यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस प्रशासन, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आले आहेत.

loading image
go to top