
Panvel Latest News: कळंबोली पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ६) पनवेलमधील वंजारी समाजातील नेत्यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले.
याचा निषेध म्हणून पनवेल व कळंबोली परिसरात जातीयवाद पसरवणाऱ्या वंजारी समाजातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना समज द्यावी, यासाठी शनिवारी (ता. ११) शेकडो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त व कळंबोली पोलिस ठाण्यात निवेदन दिले.