
Kharghar: बेलापूर पेंधर मार्गांवर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेत सकाळी बिघाड झाल्याने मेट्रो सेवा बंद झाल्याने प्रवासांची तारांबळ उडाली.
नवी मुंबई मेट्रोला सुरु होवून वर्ष झाले असून दैनंदिन वीस हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करीत असतात .दरम्यान गेल्या वर्षभरापासून नियमितपणे सुरु असलेल्या मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानक लगत सिग्नल यंत्रनेत सकाळी आठच्या सुमारास बिघाड झाल्यामुळे मेट्रो बंद बंद पडली. सकाळी नोकरीं, उद्योग व्यवसाय साठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवासांनी मेट्रो स्थानकावर पोहोचल्यावर उपस्थित सुरक्षा रक्षक कडून मेट्रो सेवा बंद असल्याचे समजल्याने प्रवांसांची तारांबळ उडाली.