नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळेना | Navi Mumbai Metro Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navi Mumbai Metro Updates

नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळेना

खारघर - नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून अत्यावश्यक सर्व चाचण्या झाल्या आहेत. महाराष्ट्रदिनी ही सेवा सुरू होणार, अशी आशा नवी मुंबईकरांना होती. मात्र सिडकोला मेट्रो सेवा शुभारंभासाठी मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे मुहूर्तासाठी तारीख पे तारीख चर्चा सुरू आहे. सिडकोने बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम २०११ सुरू केले आहे. उद्‌घाटन प्रसंगी २०१४ मध्ये मेट्रो धावेल, असे विश्‍वास व्यक्‍त करण्यात आला होता. दरम्यान अनेक विघ्न आल्‍याने काम रखडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने गतवर्षी प्रकल्पाची देखभाल व प्रकल्प सुरू करण्याचे काम महामेट्रोला दिले. (Navi Mumbai Metro Updates)

सप्टेंबर महिन्यात वेग आणि इतर प्रमाणपत्र दिले गेले. एप्रिल महिन्यात रेल्वे सुरक्षा मंडळाकडून पत्रही प्राप्त झाले आहे. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, सर्व परवानग्या मिळाल्या मात्र मॅनेजमेंट समिती या विषयी काम पाहत असल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.

११ किमीसाठी ११ वर्षे प्रतीक्षा

बेलापूर ते पेंधर हा अकरा किमीच्या मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ २०११ साली करण्यात आला. मात्र त्‍यानंतर कामात अनेक विघ्‍ने आली. सिडकोने महामेट्रोचे नियुक्ती करून पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान पहिल्या टप्पा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्‍या. सर्व चाचण्या पूर्ण होऊन, प्रमाणपत्र मिळूनही सिडकोकडून हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे मेट्रो सुरू करता येणार नसल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिडकोचे माजी अधिकारी नाराज

सिडकोने नवी मुंबई मेट्रोचे काम सुरू झाल्यावर काही अधिकाऱ्याकडे नवी मुंबईची मेट्रोची जबाबदारी सोपविली. दहा वर्षात मेट्रोचे काम पाहणारे काही अधिकारी सेवानिवृत्त झाले. सिडकोच्या माजी अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, मेट्रोसाठी लागणारी जागा आहे. सिडकोकडे पैसा आहे. मात्र योग्य प्रकारे नियोजन नसल्यामुळे अकरा वर्षात मेट्रो सुरू करता आले नाही, हे पाहून दुःख वाटते असे सांगितले.

Web Title: Navi Mumbai Metro Not Found Suitable Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Navi MumbaiMetrocidco
go to top