

5575 crore metro project Navi Mumbai
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गिका-१अ (बेलापूर ते सागर संगम) आणि मार्गिका २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टि-४) या पाच हजार ५७५ कोटी खर्चाच्या मेट्रो प्रकल्प अहवालास राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार असून, कालबद्ध कार्यक्रम १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश एमएमआरसीएल व सिडकोला देण्यात आले आहेत.