सहा वर्ष रखडलेली नवी मुंबईकरांच्या हक्काची मेट्रो अखेर धावणार; पेंधर ते सेंट्रल पार्क मार्ग 'या' महिन्यात होणार सुरु

सुजित गायकवाड
Tuesday, 23 February 2021

बेलापूर ते पेंधर या अकरा किलोमीटर मार्गातील स्थापत्य कामेही नव्वद टक्के पूर्ण झाली आहेत.

नवी मुंबई, खारघर : बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेचे रखडलेले काम सिडको महा-मेट्रोला देणार असून या कामाचा करार आज ( मंगळवार, ता. 23) होणार आहे. या करारानुसार डिसेंबरला पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान धावणार असून डिसेंबर 2022 अखेरपर्यंत बेलापूर ते पेंधर मेट्रो रुळावर धावेल अशा पद्धतीने सिडकोने नियोजन केल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सकाळला सांगितले. 

बेलापूर, पेंधर मेट्रो सुरू होण्याच्या चार वेळा तारखा जाहीर करूनही आतापर्यंत न धावणारी सिडकोची नवी मुंबई मेट्रो येत्या डिसेंबरमध्ये धावणार आहे. सहा वर्षे रखडलेले या सेवेचे काम संथगतीने सुरू असल्याने सिडकोने सर्व कंत्राटदारांना हटवून त्या जागी महा-मेट्रोला हे काम दिले आहे. या कामाचा लेखी करार मंगळवारी होणार आहे.

महत्त्वाची बातमी : 58 बँक खाती, 171 फेसबुक पेजेस, 5 टेलिग्राम चॅनेल्स आणि 54 मोबाईल्स; सेक्सटॉर्शनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश

बेलापूर ते पेंधर या अकरा किलोमीटर मार्गातील स्थापत्य कामेही नव्वद टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र, विद्युत, माहिती तंत्रज्ञान आणि तांत्रिक कामे अद्याप शिल्लक आहेत. मेट्रो रेलमध्ये सर्वात महत्त्वाची डक्‍ट लाइन टाकण्याचे काम असून सिडकोने शीव पनवेल मार्गावरील उड्डाणपूल देखील या डक्‍टने जोडला आहे. त्यामुळे तांत्रिक आणि विद्युत कामांचे आव्हान आता शिल्लक आहे. सिडकोने हे काम आता 'महा मेट्रो'ला देण्याचा निर्णय घेतला आहे. महामेट्रोने नागपूर व पुण्यातील मेट्रो मार्गाना चांगली गती दिली आहे. 

येत्या डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान सुरू करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर 2022 पर्यंत बेलापूर पेंधर मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.

navi mumbai metro will come on track by decemver 2022 work will be handed over to maha metro 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai metro will come on track by December 2022 work will be handed over to maha metro