

Morbe Dam pipeline Will relocated
ESakal
वाशी : नवी मुंबईतील वर्दळीच्या पाम बीच रोडवरील सेक्टर-१९, सानपाडा येथे उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या भुयारी मार्गाच्या अडथळ्यात येणारी मोरबे धरणाची १७०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आता स्थलांतरित केली जाणार आहे. या कामासाठी दोन कोटी ५२ लाख ९१ हजार ७५३ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रस्ताव सोमवारी (ता. १०) पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला.