

Morbe Dam
ESakal
वाशी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट झाली आहे. बुधवारी (ता. १८) प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, धरणात ११५.७४४ दशलक्ष घनमीटर (६०.६३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या वापराचा वेग लक्षात घेता हा साठा २४१ दिवस म्हणजेच १७ जुलै २०२७ पर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.