esakal | बेलापूर रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकाला गंडा | Belapur Railway Station
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

बेलापूर रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकाला गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेचा (Navi mumbai municipal) कर्मचारी असल्याचे भासवून एका भामट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला मास्क न घातल्याचे (no mask use) कारण देत १२०० रुपये दंड भरण्याची (Fine) भीती दाखवून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून (mobile robbery) पळ काढल्याची घटना सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानकात (cbd belapur railway station) घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी (Railway police FIR) या भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

सहदेव तांदळेकर (वय ६१) असे फसवणूक झालेल्याचे नाव असून, ते वडाळा येथे राहतात. ते बेलापूरमधील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. गेल्या आठवड्यात कामावरून सुटल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी बेलापूर रेल्वेस्थानकावर आले. या वेळी एका अज्ञाताने महापालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून मास्क व्यवस्थित लावला नसल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवली. तसेच १२०० रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले.

तांदळेकर यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर भामट्याने फलाट क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या बेलापूर-सीएसटी लोकलच्या अपंग डब्यात नेऊन त्यांना १२०० रुपयांची पावती फाडण्यास सांगितले. तसेच ३६० रुपये व मोबाईल फोन काढून घेतला. त्यांना सीएसटीकडे त्यांचे सहकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार तांदळेकर गेले; मात्र त्या ठिकाणी कुणीही नसल्याने ते पुन्हा मागे आले असता तेथे कोणीच नव्हते. त्यानंतर तांदळेकर यांनी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

loading image
go to top