नवी मुंबई महापालिका आयुक्तांची पुन्हा बदली, नव्या आयुक्तांनी स्विकारला पदभार

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची पुन्हा बदली, नव्या आयुक्तांनी स्विकारला पदभार

मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तांच्या बदली होण्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. यावरुन मध्यतंरी बरंच राजकारणही तापलं होतं.. त्यातच आता एक नवीन अपडेट समोर आलं. ते म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नव्या पालिका आयुक्तांनी सकाळी पदभार देखील स्विकारला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर पदभार स्विकारला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी अखेर अभिजित बांगर यांची वर्णी लागली असून  
बांगर यांनी आज सकाळी पदभार स्विकारला आहे.

आण्णासाहेब मिसाळ यांची आज बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले आयएएस अभिजित बांगर यांनी आज सकाळी अचानक महापालिका मुख्यालयात आले आणि त्यांनी सर्वांना भेट देऊनपदभार स्विकारला. यावेळी मिसाळ हे सुद्धा कार्यलयात होते. मिसाळ यांनी बांगर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. मिसाळ यांची थांबवलेली बदली झाल्यामुळे महापालिका वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय.

नवी मुंबई शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यात अपयश आल्यामुळे अण्णासाहेब मिसाळ यांची काही दिवसांपूर्वीच नगरविकास खात्याने तडका-फडकी बदली केली होती. अचानक झालेल्या बदलीमुळे सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला होता. मिसाळ यांच्या जागेवर नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती केली होती. मिसाळ हे फक्त आयुक्त नसून निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून केली असल्याने त्यांची अचानक झालेली बदली सरकारला थांबवावी लागली. त्यामुळे बांगर रुजू होण्यापूर्वीच मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. त्यामुळे मिसाळ यांनी पुन्हा शहरात कामाला सुरुवात करून कोरोना रोखण्याकरिता विविध योजना आखल्या. 

स्वतः रस्त्यावर उतरून शहरात विविध ठिकाणच्या हॉट-स्पॉटला भेटी देत अधिकाऱ्यांचे कौतुक केले. एकीकडे मिसाळ यांचे शहरात कामे सुरू असली तरी बांगर यांची नवी मुंबई महापालिकेत येण्याची तयारी थांबलेली नव्हती. बांगर यांची प्रशासनाने बदली करून त्यांना नागपूर मधून कार्यमुक्त केल्याने ते नवी मुंबईचा पदभार स्वीकारण्यास इच्छुक होते.

मिसाळ यांना स्थगिती मिळाल्याने बांगर यांच्यासमोर प्रतीक्षा करण्यापलीकडे पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत कोरोनाचे वाढते रुग्ण थांबवण्याचे आव्हान मिसाळ यांना देण्यात आले होते.

दर दोन दिवसाआड सीएमओ कार्यालयातून कोरोनाची माहिती जाणून घेतली जात होती. त्यामुळे कोरोनाचा दबाव मिसाळ यांच्यावर वाढतच चालला होता. अशा परिस्थितीत मिसाळ यांनीच आपल्याला कार्यमुक्त करण्याची विनंती सरकारला केल्याची सूत्रांकडून समजते. मिसाळ यांना मुक्त करताच आज सकाळी बांगर यांनी महापालिकेच्या कामाचा पदभार स्विकारला. मात्र बांगर यांनी अचानक भेट देऊन पालिकेची सूत्रे स्विकारल्यामूळे सर्वच अचंभीत झालेत.

संपादनः पूजा विचारे

Navi Mumbai Municipal Commissioner annasaheb misal transferred again

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com