शनिवारी महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

नवी मुंबई महापालिकेचा 7 मे रोजी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत 1 फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात काढली जाणार आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचा 7 मे रोजी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत 1 फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात काढली जाणार आहे. 

ही बातमी वाचली का? जिओ ग्राहकांनो, थायलंडला जाण्यासाठी बॅगा भरा!

महाविकास आघाडी सरकारने पॅनेल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीच्या आणि त्याबाबत काढण्यात येणाऱ्या आरक्षण सोडतीला स्थगिती दिली होती. त्यामुळे डिसेंबरमध्ये काढण्यात येणारी आरक्षण सोडत थांबवण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने नव्याने अध्यादेश काढून जुन्या पद्धतीने प्रभागनिहाय निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर पुन्हा आयोगाने प्रभागनिहाय रचनेचा अहवाल पालिकेकडून मागवला. हा अहवाल गेल्या 15 दिवसांपूर्वी त्रिसदस्यीय समितीच्या मंजुरीनंतर आयोगाला सादर करण्यात आला. हा अहवाल आयोगाला प्राप्त झाल्यानंतर त्याचे आयोगासमोर सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी पालिकेचे तीन अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मंगळवारी (ता.28) नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश पालिका निवडणूक विभागाला दिले. त्यानुसार 1 फेब्रुवारी रोजी ही आरक्षण सोडत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात काढली जाणार आहे. 

ही बातमी वाचली का? आवक वाढल्याने कोथिंबीरीच्या भावात वाढ

हरकती, सूचना मागवण्यात येणार 
3 फेब्रुवारीला आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. 3 ते 10 फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती सूचना सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. 12 फेब्रुवारीला आलेल्या हरकती व सूचना आयोगाकडे सादर केल्या जाणार आहेत. 111 प्रभागांत 50 टक्के महिला आरक्षण असल्याने 56 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation election reservation quota on 1st February