esakal | नगरसेवकांना हवीये 'ही' सुविधा, नाहीतर उपोषण!
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेवकांना हवीये 'ही' सुविधा, नाहीतर उपोषण!

नवी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी शुक्रवारी (ता.31) झालेल्या सर्वसाधारण सभेत आजी-माजी नगरसेवकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा देण्याची मागणी केली. महापौर जयवंत सुतार यांनी प्रशासनास पुढील महासभेत 1995 पासून ते आजतागायत असलेल्या आजी-माजी नगरसेवकांना आरोग्य विमा देण्यात यावा. तसा प्रस्ताव आणण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता नगरसेवकांना आरोग्य विमा मिळणार आहे. 

नगरसेवकांना हवीये 'ही' सुविधा, नाहीतर उपोषण!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी शुक्रवारी (ता.31) झालेल्या सर्वसाधारण सभेत आजी-माजी नगरसेवकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा देण्याची मागणी केली. माजी नगरसेवक कोंडीबा तिकोने लम यांच्या आजारपणाचे उदाहरण देत चौगुले यांनी सभागृहात या विषयावर आवाज उठवल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही मागणी लावून धरली. त्यानंतर महापौर जयवंत सुतार यांनी प्रशासनास पुढील महासभेत 1995 पासून ते आजतागायत असलेल्या आजी-माजी नगरसेवकांना आरोग्य विमा देण्यात यावा, तसा प्रस्ताव आणण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता नगरसेवकांना आरोग्य विमा मिळणार आहे. 

ही बातमी वाचली का? जामीन घेताना कागदपत्रांची सत्यता तपासा

याबाबत बोलताना चौगुले यांनी सभागृहात सांगितले, माजी नगरसेवक कोंडीबा तिकोने लम हे आजारी असून, त्यांना पालिकेच्या माध्यमातून फोर्टीज रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे तिकोने यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, असे सांगितले. तसेच त्यांनी यापुर्वी पुणे व पिंपरी आरोग्य विमा नगरसेवकांना आरोग्य विमा दिला जातो. पालिकेच्या अर्थसंकल्पात त्यासाठी विशेष तरतूद केली जाते. नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनादेखील असा आरोग्य विमा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. अर्थसंकल्पीय विशेष महासभेत तसेच माजी नगरसेवक निवृत्ती जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रति केलेल्या श्रद्धांजलीपर भाषणात चौगुले यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. शुक्रवारीदेखील माजी नगरसेवक तिकोने यांच्या आजारपणाचे उदाहरण देत चौगुले यांनी आरोग्य विम्याच्या मुद्द्यास हात घातला. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी साथ देत, विविध समस्यांचा पाढा वाचला. यानंतर महापौरांनी प्रशासनाला नगरसेवकांसाठी आरोग्य विमा काढण्याचे आदेश दिले. 

ही बातमी वाचली का? तुरुणीचा घरात संशयास्पद मृत्यू

सिडकोने नवी मुंबईतील जमिनी घेऊन त्या अनेक संस्थांना दिल्या आहेत. त्यात नगरसेवकांसाठीदेखील कोटा सुरू करण्यात यावा. नगरसेवकांच्या आरोग्य विम्याचा प्रस्ताव येत्या महासभेत आला नाही, तर प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल. 
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते, महापालिका.