

New Year 2026
sakal
तुर्भे : नवी मुंबईत एकीकडे महापालिका निवडणुकींचा ज्वर चढलेला असतानाच, दुसरीकडे थर्टी फर्स्टच्या जल्लोषाचीही जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरात सध्या राजकीय हालचाली आणि नववर्ष स्वागताचा उत्साह हे दोन्ही विषय एकाच वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. उमेदवारांचे दौरे, बैठका, प्रचार फेऱ्या सुरू असतानाच हॉटेल्स, पब्स, मॉल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटनस्थळे ३१ डिसेंबरच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.