esakal | ऐरोली, कोपरखैरणेतील पास केंद्र आजपासून सुरू होणार | Pass center
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai municipal corporation

ऐरोली, कोपरखैरणेतील पास केंद्र आजपासून सुरू होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : कोरोनाकाळात (Corona) नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai municipal) परिवहन अत्यावश्‍यक सेवेत असल्याने सरकारच्या निर्देशानुसार (mva Government) बस सेवा अति अल्प प्रमाणात सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे पास सेंटरही (pass center) बंद होते. २३ सप्टेंबरपासून वाशी व सीबीडी या दोन बसस्थानकातील पास सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. तर ऐरोली व कोपरखैरणे बसस्थानकातील केंद्र ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

कोरोनाकाळात नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे पास केंद्र बंद ठेवण्यात आले होते. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा उपलब्ध होती. मात्र, कोरोनाच्या प्रदीर्घ टाळेबंदीनंतर सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले. त्यानुसार नवी मुंबई परिवहन उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने बसमध्ये वाढ करून सेवा पूर्ववत करण्यात येत आहे.

याच उपाययोजनांचा भाग म्हणून २३ सप्टेंबरपासून परिवहन उपक्रमाच्या वाशी व सीबीडी या दोन बसस्थानकांतील पास केंद्र पूर्ववत सुरू झाले आहे. तर आजपासून ऐरोली व कोपरखैरणे बसस्थानकातील पास केंद्रही सुरू करण्यात येणार आहेत. हे पास केंद्र रविवार व सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त इतर दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत.

तुर्भे, वाशी, सीबीडी आणि ऐरोली, कोपरखैरणे बसस्थानक येथील पास केंद्राद्वारे मासिक, त्रैमासिक, वार्षिक आदी प्रकारचे बस पास आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडे देण्यात येणारे सवलतीचे; तसेच दिव्यांगांसाठी देण्यात येणारे मोफत प्रवासाचे पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एनएमएमटीच्या सर्व प्रवाशांनी या पास सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी केले आहे.

loading image
go to top