राज ठाकरे आज वाशी कोर्टात होणार हजर, ठाकरेंच्या हजेरीला इव्हेन्टचे स्वरुप

राज ठाकरे आज वाशी कोर्टात होणार हजर, ठाकरेंच्या हजेरीला इव्हेन्टचे स्वरुप

नवी मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी) रोजी वाशी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी येणार आहेत. 30 जानेवारी 2014 ला वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रोक्षोभक वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्या प्रकरणी आज (ता. 6) वाशी कोर्टात राज ठाकरे यांना जबाब नोंदवण्यासाठी कोर्टाने हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्या समन्सला प्रतिसाद देत राज ठाकरे सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बेलापूर न्यायालयात हजर होणार आहेत. त्यानंतर ते मनसेच्या सीवूड्स सेक्‍टर नवीन 50 येथील मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी जाणार असल्याचे समजते.

राजकीय इव्हेन्टचे स्वरूप

मात्र, ठाकरेंच्या या दौऱ्याला नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांनी राजकीय इव्हेन्टचे स्वरूप दिले आहे. ठाकरे ज्या मार्गाने शहरात येणार आहेत. त्या सर्व मार्गांवर राज ठाकरेंच्या स्वागताची बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरभर लावलेल्या या बॅनरमुळे ऐन स्वच्छता सर्वेक्षणाच्या कालावधीत शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. 

शहरभर लागलेल्या या बॅनरमुळे नागरिकही चक्रावून गेले आहेत. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.  

राज ठाकरेंच्या नवी मुंबई दौऱ्याचा महापालिका निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी नवी मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच वापर करून घेतला आहे. जागोजागी रस्त्यांवर आणि मुख्य चौकात राज ठाकरेंचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. सायन-पनवेल महामार्गावर वाशी टोलनाका ओलांडताना राज ठाकरेंच्या नजरेस पडणाऱ्या होर्डींग्जवर बॅनर लावण्यात आले आहेत. अगदी बेलापूर सेक्‍टर 15 येथील न्यायालयाच्या इमारतीसमोरील दुभाजकावरही राज ठाकरे यांचे स्वागत करणारा बॅनर लावला आहे. 

navi mumbai news raj thackeray will be present in front of vashi court banners of thackeray all over city



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com