कांदा-बटाटा मार्केटमधील वाद कायम; व्यापाऱ्यांची कोंडी | Apmc market update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apmc

कांदा-बटाटा मार्केटमधील वाद कायम; व्यापाऱ्यांची कोंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा : कृषी उत्पन्न बाजार समितीत (Apmc market) कांदा-बटाटा मार्केटमध्ये (onion-potato market) ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाच्या गोणी भरू नये, यासाठी दीड वर्षापासून एपीएमसी प्रशासनाने (Apmc authority) नियम तयार केला आहे; मात्र नियम डावलून जास्त वजनाच्या गोण्या येत आहेत. या गोणी उचलण्यास माथाडी कामगारांचा (Mathadi workers) विरोध आहे.

हेही वाचा: मुंबई : टाटा रुग्णालयाला घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

वर्षभरापासून त्याची अंमलबजावणी होत नसल्‍याने अखेर सोमवारपासून माथाडी कामगारांनी केवळ ५० किलोपर्यंत वजन उचलले जाईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी तशाच राहिल्याने हा शेतमाल बाहेरील कर्मचाऱ्यांकडून खाली करण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढवली आहे. केंद्र शासनाने जानेवारी २०२० मध्ये शेतमालाच्या ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या नसाव्यात, असा आदेश काढला होता.

मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने माथाडी कर्मचाऱ्‍‌यांनी वारंवार आंदोलने केली. सोमवारपासून ५० किलोपर्यंतच वजनाच्या गोणी उचल्या जातील, अशी भूमिका घेतली. तसेच एपीएमसी प्रशासनानेही ५० किलोहून अधिक वजनाच्या गाड्यांना प्रवेश दिला जाणार नसल्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे व्यापाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

"गुरुवारी बाजारात ८५ गाड्यांची आवक झाली. त्यामध्ये अधिक वजनाच्या २४ गाड्या शिल्लक राहिल्या; तर दोन दिवसांच्या १०० शिल्लक गाड्या व्यापाऱ्यांनी बाहेरून कर्मचारी लावून रिकाम्या करण्यात आल्‍या आहेत."

- अशोक वाळुंज, संचालक, कांदा-बटाटा मार्केट

loading image
go to top