Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

Navi Mumbai Crime News: नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत एका ड्रग्ज तस्कराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
Drugs Smuggler Arrested In Navi Mumbai

Drugs Smuggler Arrested In Navi Mumbai

ESakal

Updated on

नवी मुंबई : ड्रग्जमुक्त शैक्षणिक परिसर अभियानअंतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ऐरोली परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या एका ड्रग्ज तस्कराला रंगेहाथ अटक केली आहे. गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पथकाने या कारवाईत तब्बल ४१ लाख ६० हजार रुपये किमतीचे घातक व दुर्मिळ हॅश ऑइल आणि हायड्रो गांजा जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com