Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Navi Mumbai Police Action Mode: अवैध कारभाराविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यावेळी १४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Navi Mumbai Police Action Mode

Navi Mumbai Police Action Mode

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांकडून अवैध कारभाराविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून सोमवारी (ता. ९) रात्री रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठया पोलिस फौजफाटयासह कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराकडून एक देशी कट्टा, २ जिवंत काडतुसे (राऊंड) आणि ब्राऊन शुगरच्या १०० पुडया जप्त करत इतर गुन्हेगारांची धरपकड केली. या संपूर्ण मोहिमेत एकूण १४ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com