बेल्ट वरून समजलं हा खडकबहाद्दुरच आहे,  मग पोलिसांनी आवळल्या कैलाशच्या मुसक्या

बेल्ट वरून समजलं हा खडकबहाद्दुरच आहे, मग पोलिसांनी आवळल्या कैलाशच्या मुसक्या

नवी मुंबई : 13 फेब्रुवारी रोजी उलवे येथील खाडीत हत्या करुन टाकून देण्यात आलेला मृतदेह घणसोलीतील खडकबहादुर सिंग(45) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा युनिट-3च्या पथकाने या गुन्हयाचा छडा लावत या हत्या प्रकरणातील तीन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. मृत खडकबहादुर हा त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने त्याच्या पत्नीच्या प्रियकराने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह ऐरोली खाडीत टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

या घटनेतील मृत खडकबहादुर हा घणसोलीतील दत्तनगर येथे पत्नी व मुलांसह रहाण्यास होता. खडकबहादुर याच्या पत्नीचे घणसोली भागातील चायनिज गाडी चालवणारा कैलाश शालीग्राम खरात (29) याच्या सोबत अनैतिक संबध होते.याबाबत खडकबहादुर याला कुणकुण लागली होती. त्यामुळे तो संशयावरुन आपल्या पत्नीसोबत भांडण करत होता. ही बाब कैलाश खरात याला समजल्यानंतर त्याने खडकबहादुर याचा कायमचा काटा काढण्यासाठी आपले मित्र जय शंकर चव्हाण (25) आणि वली अहमद मशकअली सय्यद (20) या दोघांना मदतीला घेतले. त्यानंतर या तीघांनी गत 9 फेब्रुवारी रोजी रात्री10.30 वाजण्याच्या सुमारास खडकबहादुर याला गाठ्रुन त्याचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरला. तसेच त्याच्या डोक्यामध्ये व हातावर वार करुन त्याचा मृतदेह ऐरोलीतील खाडीत टाकून दिला होता. 

सदर मृतदेह पाण्यातुन वहात जाऊन 13 फेब्रुवारी रोजी उलवे येथील खाडीत पोहोचल्यानंतर एनआरआय पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेतला होता. सदर व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे आढळुन आल्यानंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात करेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास सुरुवात केली होती. एनआरआय पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट-3कडून देखील या हत्या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. त्यासाठी गुन्हे शाखेकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नवी मुंबईतील तसेच आजुबाजुच्या आयुक्तालयातील हरविलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेण्यात येत होती. 

यादरम्यान, रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मिसींग तक्रारीतील व्यक्तीचे वर्णन उलवे येथील खाडीत सापडलेल्या मृत व्यक्तीशी मिळते जुळते असल्याचे आढळुन आल्यानंतर गुन्हे शाखेने मृत खडकबहाद्रु सिंग याच्या कुटुंबियांना मृताचे फोटो दाखवून त्यांच्याकडे विचारपुस केली. त्यावेळी मृत व्यक्तीचे कपडे व कमरेला असलेल्या बेल्टवरुन सदरचा मृतदेह हा खडकबहाद्दुर याचा असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी ओळखले.

त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व त्यांच्या पथकाने मृत खडकबहादुर व त्याचे नातेवाईक वापरत असलेले मोबाईल फोनची तांत्रिक माहिती काढुन तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून या हत्या प्रकरणातील आरोपी कैलाश खरात, जय चव्हाण आणि वली अहमद या तीघांची घणसोली भागातुन धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर खडकबहादुर हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली तीघा आरोपींनी दिली. 

navi mumbai police solved case from the evidence of belt khadakbahaddurs belt 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com