भाजप, शेकाप, काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर | Navi mumbai political update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai municipal

भाजप, शेकाप, काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर

खारघर : येत्या मे महिन्यात पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका (Panvel municipal election) होत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील काही काँग्रेसचे कार्यकर्ते (congress leaders), तसेच भाजप आणि शेकापचे (SKP) काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करून हातावर घड्याळ बांधणार असल्याची चर्चा पनवेल परिसरात सुरू आहे. या वृत्ताला राष्ट्रवादीनेही दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : दाखल्यासाठी पैसे मागणारे दोन शिक्षक निलंबित

एप्रिल महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील महिन्यात दोन वेळा नवी मुंबईला भेट देवून कामाचा आढावा घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. नवी मुंबईपाठोपाठ मे महिन्यात पनवेल महापालिकेची निवडणूक होणार आहे. पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. तर शेकापचे २३ नगरसेवक पालिकेत निवडून गेले होते. मात्र, नगरसेवक असूनही प्रभागातील कामे न झाल्यामुळे मतदार नाराज आहे.

काही महिन्यांपूर्वी बँक घोटाळ्यात माजी आमदार हे तुरुंगात गेल्यामुळे भविष्यात शेकाप बदनाम झाले आहे. साडेचार वर्षांत सत्तेवर असूनही प्रभागातील कामे झाली नाही. त्यामुळे भाजपचे काही नगरसेवक नाराज आहे. त्यात पनवेल महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ मालमत्ता करामुळे मतदार नाराज आहेत.

त्यामुळे महाविकास आघाडीकडून मालमत्ता कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्यामुळे आणि येणारी पालिकेची निवडणूक महाविकास आघाडी मिळून लढवण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून काँग्रेसचे पदाधिकारी, भाजप आणि शेकापचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यात भाजपचे पाच, शेकापचे सात आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी हातावर घड्याळ बांधणार आहेत. वरील पक्ष प्रवेश झाल्यास पालिका परिसरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

राज्यात जलसंपदामंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या कामाच्या पद्धती, पक्षाचे कार्य आणि पनवेलमध्ये राष्ट्रवादीचे काम पाहून काँग्रेसचे कार्यकर्ते, भाजप आणि शेकापचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत लवकरच वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे.
- सतीश पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पनवेल

loading image
go to top