
नवीन मुंबईतील नेरुळच्या महापालिका शाळेत वर्गात शिक्षिका शिकवित असताना इमारतीच्या स्लॅबचे प्लॅस्टर कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. महापालिकेने १७.७५ कोटी खर्चुन नव्याने उभारण्यात आलेल्या शाळेत हे घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्गात शिकवत असलेल्या शिक्षिकेला थोडी दुखापत झाली आहे, सुदैवाने ती यातून थोडक्यात बचावली आहे. पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.