
Panvel: पनवेल परिसरात पिस्तूल, जिवंत काडतुसांच्या विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने नेरे भागात रविवारी रात्री ही कारवाई केली.
पनवेलच्या नेरे भागात राहणारे काही तरुण पाच लाखांमध्ये दोन पिस्तूल, काडतूस विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधण्यात आला. पनवेलमधील नेरे येथील एका हॉटेलजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सापळा लावण्यात आला.