esakal | नवी मुंबईत ४८ तास पाणीपुरवठा खंडित | water scarcity
sakal

बोलून बातमी शोधा

water scarcity

नवी मुंबईत ४८ तास पाणीपुरवठा खंडित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : एमआयडीसीची (MIDC) जलवाहिनी फुटल्यामुळे (pipeline breaks) नवी मुंबईकरांचे पाण्यावाचून हाल झाले. जवळपास ४८ तास पाणीपुरवठा खंडित (water scarcity) होता.
एमआयडीसीकडून जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलून नव्याने टाकण्यासाठी गुरुवारी रात्री बारापासून शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला होता; मात्र शनिवारी रात्री पाणी सोडण्यात आल्यानंतर पुन्हा शिळ फाट्याजवळील देसाई नाक्याजवळ जलवाहिनी फुटली.

हेही वाचा: राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे

त्यामुळे एमआयडीसीच्या बारावी धरणातून पाणी मिळणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिघा, रबाळे, औद्योगिक क्षेत्र, ऐरोलीतील काही भागांत शनिवारी दिवसभर पाणी आले नव्हते. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. शनिवारी दिवसभर पाणी आले नव्हते, तर शनिवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होऊन रविवारी सकाळपर्यंत पाणी येण्याची शक्यता असल्याचे एमआयडीसीचे उपअभियंता एम. एस. गीते यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे औद्योगिक परिसरातील कारखानदारांसह झोपडपट्टीतील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल झाले.

loading image
go to top