

Water Supply
ESakal
वाशी : भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मुख्य जलवाहिन्यांवर तातडीची तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, शहरात तब्बल १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवार (ता. ६) रात्री १० वाजल्यापासून ते बुधवार (ता. ७) दुपारी २ वाजेपर्यंत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.