रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी नवी मुंबईकरांचा पुढाकार; तुर्भे स्टोअर येथे रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

रक्तदान शिबीरात तुर्भे स्टोअरमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात गोळा झालेले रक्त नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलला देण्यात आले.

 

नवी मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे स्टोअर मधील माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली तुर्भे स्टोअर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात तुर्भे स्टोअरमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात गोळा झालेले रक्त नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलला देण्यात आले.

'त्या' 144 नर्स तीन महिन्यांपासून बिनपगारी ऑन ड्युटी 24 तास

सद्या देशात कोरोनामुळे सुरू असणाऱ्या ताळेबंदीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आशा परिस्थितीत या रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गेल्या चार महिन्यापासून देशात कोरोनाची महामारी चालू असताना सुरेश कुलकर्णी यांनी स्वखर्चाने तुर्भेतील गरीब नागरिकांची काळजी घेतली. तुर्भे भागातील प्रभाग क्रमांक 68, 69, 70, 71 आणि 73 या भागाचे नागरिकांना प्रत्यक्ष मदत कुलकर्णी यांनी केली. तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, हनुमान नगर, आंबेडकर नगर मध्ये मोफत अन्नधान्य वाटप केले. तसेच संपूर्ण प्रभागात निर्जंतुकीकरण करून दिले. तुर्भे विभाग कोरोनामुक्त करण्यात कुलकर्णी यांनी महापालिकेला मोलाचे सहकार्य लाभले आहे.

हॉस्पिटलने दिलं एक लाख तीस हजारांचे बिल, बिल पाहून रुग्णाने हॉस्पिटलमधून ठोकली धूम..

कुलकर्णी यांच्या मदतीमुळे नवी मुंबईतील पाहिला विभाग कोरोनामुक्त झाला आहे. या रक्तदान शिबिराला खासदार राजन विचारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर आदींनी भेट दिली. या प्रसंगी सुरेश कुलकर्णी, माजी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी, महेश कुलकर्णी, अनिल पाटील, तय्यब पटेल, वसंत वास्के, के आर वाघमारे, विनोद मुके, दीपेश शिंदे, चांगदेव कवडे, निझाम तांबोळी, केशवलाल मोर्या, अप्पा साळवी, भरत कांबळे, कृष्णा मंजुळकर, अशोक भांबरे आदींनी परिश्रम घेऊन हे शिबीर यशस्वी केले

------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbaikar's initiative to fill the blood shortage; Spontaneous response to blood donation camp at Turbhe Store

टॉपिकस