मोठी धक्कादायक बातमी : डिशचार्ज मिळालेल्या नवनीत राणा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

सुमित बागुल
Tuesday, 18 August 2020

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना झालेल्या कोरोनाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना झालेल्या कोरोनाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी. खरंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी कोरोनावर मात केलीये हे एव्हाना आपल्या सर्वांना ठाऊक आहे. कारण स्वतः नवनीत राणा यांनी त्याबाबत सर्वांना माहिती दिली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना लीलावती रुग्णालयामधून डिशचार्ज देखील मिळाला होता. मात्र आता मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती दिली आहे.

मुंबई महापालिकेने नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोरोना टेस्ट केली असता राणा दाम्पत्य पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा त्यांच्या मुंबईतील निवास्थानी क्वारंटाईन राहणार आहेत. 

मोठी बातमी - जितेंद्र आव्हाड धावले संजय राऊतांसाठी, टीकाकारांना दिलं 'असं' उत्तर

राणा कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झालीये. नवनीत राणा यांना 6 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झालेली. त्यानंतर सुरवातीला अमरावती, त्यानंतर नागपूर आणि मग श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने नवनीत राणा यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं. आता नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला असल्याने मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याला 15 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य आता पुढील १५ दिवस त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'होम क्वारंटाईन' होणार आहेत. 

navneet rana and ravi rana detected covid positive after getting discharge from leelavati 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navneet rana and ravi rana detected covid positive after getting discharge from leelavati