
शरद पवारांनी घेतली नवाब मलिकांची बाजू; दाऊद प्रकरणाबद्दल म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. आर्थिक गैरव्यवहार, खंडणीचे आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणात गोवावाला कम्पाऊंड इथली मालमत्ता जप्त करण्यासाठी मलिकांनी दाऊद गँगच्या सदस्यांची मदत घेतल्याचं सकृतदर्शनी पुराव्यांच्या आधारे समोर आल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar on Nawab Malik)
हेही वाचा: शरद पवार-ब्राह्मण समाजाची बैठक संपली; काय झाली नेमकी चर्चा? जाणून घ्या
ब्राह्मण संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना नवाब मलिक म्हणाले, "कोर्टाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असे केवळ मत नमूद केले आहे, त्यांचा हा निर्णय नाही. गेली अनेक वर्षे मी नवाब मलिक यांना ओळखतो. माझ्या मनात मलिक यांच्या इंटेग्रिटीबद्दल अशा चुकीच्या लोकांशी संबंध ठेवण्यासंबंधी विश्वास नाही. असे आरोप केले जातात. याचे उदाहरण मी स्वत: आहे.
हेही वाचा: गोवावाला टॅक जमीन प्रकरण ः दाऊद साथीदारांच्या संगनमताने कारस्थान
आपल्यावरही असेच आरोप झाले, हे सांगताना मलिक म्हणाले, "माझ्यावरही असेच अनेक आरोप केले होते. शेवटी ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधिमंडळात भाषण करून सांगितले की आम्ही जी टीका करत होतो त्यात काही तथ्य नाही. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो. माझी खात्री आहे संपूर्ण चित्र समोर आल्यानंतरच नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल".
Web Title: Nawab Malik Mumbai Court Dawood Ibrahim Connection Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..